नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.
अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात
लक्षणे हे दोन्हीही आजार कंबर, पोट, मांडया,जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. (कुष्ठरोगात चट्टयांना खाज सुटत नाही व कमी अधिक बधिरता येते.)
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. – (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे सुरुवातीला आग होते, पणहोमिओपॅथीक औषध ने दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर काही आठवडे तरी औषध घ्यावे लागेल . नाही तर नायटा परत उमटतो. पण तुम्ही होमिओपॅथी औषध चा डोस पूर्ण केल्यावर परत फंगल इन्फेकशन होत नाही माझ्या बऱ्याच पेशंट चा अनुभव आहे
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
काही व्यक्तींमध्ये कुठल्यातरी अज्ञान कारणामुळे त्वचेच्या या पेशींना मारणाऱ्या अॅंटीबाॅडी तयार होतात व त्या मेलॅनीनच्या पेशींना निष्क्रिय किंवा नष्ट करतात. ज्या जागेवर ही प्रक्रिया होते त्या जागेवर पांढरा चट्टा उमटतो. ज्याला आपण कोड म्हणतो. 15 ते 20 टक्के व्यक्तींमध्ये कोड असतो
पांढ-या डागांमुळं कोणत्याही वेदना होत नाहीत, आरोग्यासाठी कुठलाही धोका निर्माण होत नाही, मात्र याचे मानसिक परिणाम खोलवर होऊ शकतात.
योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार घेऊन या पांढऱ्या डागांची दाहकता कमी करता येऊ शकते, या डागांवर संपुर्ण खात्रीशीर होमिओपॅथीक उपचार आहेत
कोडाचे प्रकार डागाच्या रंगावर (विरळ किंवा गडद) आणि त्याच्या आकारावर अवलंबून असतात.
शरीरावरच्या त्वचेचा रंग काही ठिकाणी फिका होतो, किंवा त्वचा पांढरी दिसते. थेट सुर्यप्रकाश त्वचेच्या ज्या भागावर पडतो त्या त्वचेचं जास्त नुकसान होतं. हात, पाय, दंड ,चेहरा ओठ या भागांत कोड पटकन पसरतो
कोड एकदा शरीरावर दिसायला लागले की ते किती मर्यादेपर्यंत वाढतील ते सांगता येत नाही.काही वेळा कोणत्याही उपचारांविना ते पसरायचे थांबतात. मात्र हे अगदी क्वचित प्रमाणात घडतं. ब-याच वेळेला हे कोड किंवा पांढरे डाग वाढत जाऊन संपूर्ण शरीरावर पसरतात.एकदा हे कोड शरीरभर पसरले की त्वचेचा नैसर्गिक रंग पुन्हा दिसणं जवळपास अशक्य असतं.
केस, त्वचा, ओठ यांना रंग देण्यासाठी रंग, म्हणजे मेलॅनीन निर्माण करणाऱ्या पेशी ज्यांना मेलॅनोसाइट म्हणतात, त्या काम करायचं थांबवतात. मेलॅनीन तयार करत नाहीत. किंवा त्या स्वतः नष्ट होतात, तेव्हा त्वचेवर पांढरे डाग तयार होतात.
या आजारात डाग पडलेल्या त्वचेचा रंग फिकट होतो, पांढरा होतो. मात्र या पेशी काम करायचं का थांबवतात हे तज्ञांना अजूनही कळू शकलं नाही.
शरीरावरचे पांढरे डाग पाहून डॉक्टर शारीरिक चाचण्या करतात.
आधी सुरु असणाऱ्या औषधांबद्दलची माहिती घेताना काही प्रश्नांच्या आधारे समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात.
कोडावरील उपचारांमुळे त्वचा सामान्य दिसण्यास मदत होते, पण हे उपचार काही गोष्टींवर अवलंबून असतात
अनेक उपचार असे आहेत जे सरसकट प्रत्येकासाठी वापरता येत नाहीत, कारण त्यांचे बरेच दुष्परिणाम असतात. कधीकधी उपचारासाठी बराच वेळ लागतो.
त्वचारोगाच्या सध्याच्या उपचारांमध्ये कोडासाठी वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया आणि बाकी काही पर्याय उपलब्ध आहेत.
बहुतेक उपचार हे त्वचेचा रंग परत आणण्याच्या दृष्टीने करतात पांढरे डाग किंवा कोड यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत.
पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करून घ्या.
पांढरे डाग किंवा कोड हा संसर्गजन्य रोग नाही, त्यामुळं ज्यांना हा रोग झाला आहे त्यांनी हिंमत हरु नये, ज्यांना हा रोग झाला नाही त्यांनी मात्र पांढऱ्या डागानं हैराण असलेल्या व्यक्तीला आदरानं वागवावं.
© 2022 Dr.Bates Bharti Homeopathy. All rights reserved | Design by ARS Software Solutions