कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते.
मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य वेदना साठी होमिओपॅथी औषध खूप चांगली काम करतात , पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी होमिओपॅथीक औषधे अधिक गुणकारी असतात.
मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.
एक महत्त्वाची गोष्ट. काही मुतखडे निदान झाल्या झाल्या लगेच औषधे घ्यावी लागतात. काही मुतखडे एकाद-दुसरा महिना थांबले तरी त्रास देत नाहीत. पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले का? हे अधुनमधून बघावे लागते. तर काहींना काही करावे लागत नाही. या सगळ्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.
© 2022 Dr.Bates Bharti Homeopathy. All rights reserved | Design by ARS Software Solutions